महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या एकास जॉबची ऑफर दाखवून १७ लाखास फसवल्याची घटना पारगे नगर कोंढवा परिसरात घडली आहे.
या प्रकरणी एक ४१ वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर संपर्क
साधला व वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर दाखवून १७,९७,६५०/- रु. बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले.
त्याला बळी पडून त्यांनी बँकेत रक्कम भरली. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.
