माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : निधी अभावी रखडलेल्या कात्रज – कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटीचा शासनाचा निधी महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे.
कात्रज – कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्याचे काम निधी अभावी जवळपास बंद झाले होते. दरम्यान माजी आमदार योगेश टिळेकर यांनीनिधी साठी प्रयत्न केले.
यावेळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना योगेश टीळेकर म्हणाले की,भू संपादनासाठी रस्तारुंदीकरणातील जागा ताब्यात देण्यासाठी नागरिकांना रोख रक्कमेच्या मागणीसाठी भडकवले गेले.
राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भूसपदानांच्या निधीची मागणी केली. सदर निधी दि. १४ जानेवारी २०२३ रोजी निधी मंजूर झाला. कामाची प्रत्यक्ष पाहणी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकारी,पोलीस अधिकारी सह केली.
त्यानंतर राज्यसरकारने ०१ जुलै रोजी हा निधी शासनाकडून महानगरपालिकेकडे वर्ग झाल्याने हा रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्ता रुंदीकरणातील बाधित जागा मालकांनी योग्य मोबदला घेऊन लवकरात लवकर जागा पुणे महानगरपालिकाच्या ताब्यात द्यावी असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.















