महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगावातील योजनानगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे.
या प्रकरणी एक ३४ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी जे. के. पार्क डिफेन्स कॉलनी जवळ, सर्वे नं ९७/१ अनुज्योत बंगला योजना नगर येथे ही घटना घडली.
यातील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, आंत प्रवेश करून, बेडरूम मधील कपाटातील रोख ९०,०००/- रु. व सोन्या-चांदिचे दागिने असा एकुण २,११,४४०/- रु.कि.चा ऐवज घरफोडी चोरी करून नेला.
विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास पोलीस अंमलदार, यु.आर. धेंडे करीत आहेत.
