महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विमानतळ परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाला टास्कच्या बहाण्याने १२ लाखाला फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका ३९ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हा फसवणुकीचा प्रकार फेब्रुवारीत ०४ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला आहे.
एका अनोळखीने त्यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला व टास्क पुर्ण करण्यास सांगुन जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना १२,००,००० लाख रुपये जमा करण्यास सांगितले.
वाट पाहूनही परतावा न मिळाल्याने त्यांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.

















