महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद होऊ हाणामारी झाली. तसेच कोयत्याने व कोकरीने वार करुन लॉकअपमध्ये गेलो व सुटून आलो की दिसेल तिथे तुकडे करू अशी धमकी दिली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा प्रकार रविवारी (दि.30 जून) सायंकाळी मेंटल हॉस्पिटलच्या मैदानात घडला. याबाबत 51 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हुसेन अस्लम खान, अमीर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोयेब रशिद कुरेशी, विरेन वाघेला, स्टीफन जॉन्सन शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेंटल हॉस्पिटलच्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी आरोपी आणि विल्सन अॅन्ड्रो मरीअन यांच्यात वाद झाले. आरोपीने विल्सन याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी त्यांची बहिण व तिची मुले भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी हुसेन याने अमीर याला कोयता घेऊन येण्यास सांगितले. अमीर याने कोयता व कोकरी आणून फिर्य़ादी यांच्या बहिणीच्या मुलाला मारहाण केली.
तर फिर्यादीच्या बहिणीवर वार करुन गंभीर तिला जखमी केले. फिर्यादी बहिणीला वाचवण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन मारहाण केली.
तसेच बहिणीच्या मुली भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांच्याही अंगावरील कपडे फाडून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तिथून पळून जाताना आरोपी अस्लम खान याने फिर्यादी व इतरांना म्हणाला की, आम्ही लॉकपअपला गेलो व सुटून आलो की दिसेल तिथे सर्वांचे तुकडे करु घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. हा तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
