महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : नुतन लायनेस्टीक वर्ष १ जुलै व राष्ट्रीय डॉक्टर दिन याचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयल चे अध्यक्ष ला.वर्षा गुंदेचा, खजिनदार ला.राजुल कांकरीया, वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड डॉ. कैवल्य गायकवाड यांचा हस्ते बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सर्व डॉक्टरांचा धावपळीच्या दिनक्रमात तसेच तणाव विरहित आयुष्य जगण्यासाठी ब्रह्मकुमारी अनिता करवा यांचे व्याख्यान डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आले होते.
त्यांनी सोप्या भाषेत त्यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची संकल्पना ला. डॉ. निनाद दोशी व डॉ. स्नेहल दोशी या दांपत्याची होती. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. गौरी गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्लबचे आधारस्तंभ माजी प्रांतपाल एमजेएफ. ला.जितेंद्र दोशी व ब्रह्मकुमारी. अनिता करवा हे लाभले.
या कार्यक्रमावेळी ला. अमर काळे, ला. संजय खांडवीकर, ला. अमीत कांकरीया, ला. विशाल साळुंके व सन्माननीय उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब बार्शी रॉयल च्या ला. शिल्पा दोशी, ला. मिना जैन, सुजाता मुथ्या, कावेरी बागुल, वैशाली बारबोले, रेश्मा लोढा, राधिका बजाज, तृप्ती दोशी, सिमा काळे, ज्योती रुगले, डॉ चित्रा अणवेकर, वर्षा चांगभले, डॉ किरण लाड तसेच हिरेमठ हॉस्पिटल चा स्टाफ यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन ला. सुजात मुथ्था व ला. ज्योती रुगले यांनी केले.