‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प : मंगलप्रभात लोढा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
वानवडी येथे कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ मंत्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजना, कौशल्याबाबतचे ज्ञान व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यादृष्टीने कौशल्य विकास दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीत औद्यगीक प्रशिक्षण संस्थेचे ५ हजार विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.















