महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक केल्यास कंपनीकडून त्याबदल्यात पैसे मिळतील असे सांगून, एक लिंक देऊन ग्रुप जॉईन करून घेवून वेगवेगळे टास्क देवून महिलेची सोळा लाख रुपयांची फसवणुक करण्याचा प्रकार महमदवाडी उंड्री परिसरात घडला आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेस अनोळखी ने ऑनलाईन माध्यमाव्दारे वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे मिळणार असे सांगून, एक लिंक देऊन ग्रुप जॉईन करून घेवून वेगवेगळे टास्क देवून फिर्यादीची १६,५१,८००/- ची आर्थिक फसवणूक केली.
या महिलेने नफा मिळणार, खात्यात पैसे जमा होणार या आशेपोटी त्यांचा खात्यात वेळोवेळी रकमा जमा केल्या. मात्र परतावा व पार्ट टाइम नोकरीही मिळाली नाही. २३ डिसेंबर व २४ जानेवारी या काळात ही घटना घडली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.