महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तुम्ही इराणला पाठवलेल्या पार्सल मध्ये ड्रग मिळाले आहेत, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल अशी भीती दाखवूनएका अनोळखी व्यक्तीने कोंढव्यातील युवकाकडून तब्बल ३२ लाख रुपये उकळल्याची घटना एनआयबीएम महमदवाडी, येथे घडली आहे. ५ जुन रोजी ही घटना घडली आहे.
फिर्यादीने पाठवलेल्या पार्सल मध्ये ड्रग मिळाले आहेत. त्याबाबत मुंबई नार्कोटिक्स येथे केस दाखल केल्याची व अटक करण्याची भीती या युवकाला दाखवण्यात आली.
त्यामुळे भीतीपोटी त्याने ३२ लाख रुपये दिले या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.
