महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली झाल्यानंतर, बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत बार्शी शहरांमध्ये उत्सुकता होती.मात्र आता बार्शी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकपदी बालाजी कुकडे यांची नियुक्ती झाली आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार, सुरक्षा शाखा ( अति. कार्य. जि. वि. शा. ) यां ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बार्शी पोलीस ठाण्याची धुरा बालाजी कुकडे यांच्या कडे आली आहे.















