महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी परिसरात एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी मुलावर सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) रात्री आठच्या सुमारास पिडीत मुलीच्या राहत्या घराजवळ घडला आहे.
याबाबत 14 वर्षाच्या पिडीत मुलीने मंगळवारी (दि.2) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर नवीन न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास आरोपीने मुलीचा हात पकडून घराशेजारी असलेल्या बोळीत नेले. शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच मागील दोन महिन्यापूर्वी पीडित मुलीचे आई-वडील घरात नसताना आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील चाळे केले.
याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.















