स्टेरॉईड इंजेक्शन जप्त, एकास अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी अंमली पदार्थ, ड्रग विक्री करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा रोड वरील लोखंडी पुलाजवळ कारवाई करत एकास ताब्यात घेऊन त्याच्या कडून स्टेरॉईड इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत.
३० जून रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना बातमी मिळाली की, सातारा रोडवरील लोखंडी पुलाकडे एक इसम बॉडी बिल्डींगसाठी लागणारे अवैध इंजेक्शनची ग्राहकांना विक्री करीत आहे.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सातारा रोडवरील लोखंडी पुलाच्या खालील बाजुस जावुन छापा मारला. त्यावेळी तेथे आझाद मुमताज खान, (४१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर सी, प्रेम हाईटस, सनं ३३/३ बी. आंबेगाव बु. पुणे) हा मिळून आला.
बाँडी बिल्डींगसाठी लागणारे अवैध इंजेक्शन व ५ सिरींजसह मिळुन आल्या आहेत. त्याच्याकडुन हे सर्वं साहित्य जप्त करुन त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदिनीवग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.















