महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : व्यवसायात भागीदारी देतो असे सांगून ३० लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.
या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून विमानतळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने बॅडमिंटन कोर्ट, कॅफे, योगा स्टुडीओ व क्रीडा साहित्याचा व्यवसाय सुरू करणार आहे.
यातील व्यवसायामध्ये प्रॉफिट शॉप शेअरींग भागीदार करून घेण्याचे अमिष दाखवले. त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले व व्यवसायामध्ये भागीदार करून न घेता व त्यासाठी कोणतेही कागदपत्रे, हिशोब न देता, फिर्यादी यांची एकुण ३०,२८,३०८/- आर्थिक फसवणूक केली.
असे फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे). सर्जेराव कुंभार तपास करीत आहेत.















