चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घटना : अल्पवयीन आरोपीला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : किराणा माल विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. वडगावशेरी येथील साईनाथनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत एका किराणा दुकानदाराने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे साईनाथनगर भागात किराणामाल विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी ३ च्या सुमारास अल्पवयीन मुलगा व एक जण दुकानात शिरला.
या भागात व्यवसाय करायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. कोयत्याचा धाक दाखवून त्याने दुकानदाराकडून २०० रुपये घेतले, अल्पवयीन मुलाने या परिसरातील अन्य दुकानदारांना खंडणीसाठी धमकावले. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर मुलाला ताब्यात घेण्यात आले. हा तपास सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर करत आहेत.
