कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत घटना : शेअर्स ट्रेडिंगमध्ये होत आहे सायबर फसवणुक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळविण्याचे प्रलोभन दाखवत मूळ रक्कम आणि परतावा न देता एकाला सायबर चोरट्यांनी ४० लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १६ मे ते ८ जुलै २०२४ दरम्यान घडला.
शेअर्स ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष दाखवून काही प्रमाणात नफा फक्त त्यांच्या मोबाइल अॅपमध्ये दर्शवून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी नफा काढण्याचा प्रयत्न केला असता मूळ रक्कम आणि परतावा असे काही न देता फिर्यादीची ३९ लाख ८० हजार ९७० रुपयांची फसवणूक केली. हा तपास उप पोलीस निरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहे.
