कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईलवर बोलून अनोळखी व्यक्तीकडून फसवणुक होण्याचे प्रकार वाढले आहेत. आता शहरालगतच्या उपनगरात असे प्रकार होऊ लागले आहेत. कोंढव्यातील एकाने याबाबत १२ लाखाची फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे.
फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला काही नफा जमा करण्यात आला. त्यामुळे फिर्यादीने आणखी गुंतवणूक करण्यास रक्कम जमा केली.मात्र नंतर काहीही परतावा न देता त्यांची १२ लाख ४५ हजाराची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.
