महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती २०२२- २३ रिक्त असलेली १८ चालक पोलीस शिपाई पदासांठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी लेखी परीक्षा होणार आहे.
जात प्रवर्ग निहाय व समातंर आरक्षाणानुसार १:१० प्रमाणात एकूण २५४ चालक पोलीस शिपाई यांची यादी या कार्यालयाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षा ए.के.के न्यू. लॅ. अॅकडमी अॅन्ड पीएचडी लॉ रिसर्च सेंटर २३९० के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस पुणे ४११००१ या ठिकाणी दि. १४ जुलै २०२४ रोजी आयोजित केली आहे.
उमेदवारांनी सकाळी ७.०० वा. महाआयटी ओळखपत्र, शारीरिक चाचणी ओळखपत्र व आधारकार्ड घेवुन नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे. असे आवाहन रेल्वे पोलीस अधिक्षक तुषार जोशी यांनी केले आहे. परीक्षेला येताना कोणतेही (घडयाळ, इलेक्टॉनिक उपकरणे, ब्ल्युथूत, मौल्यवान वस्तू (सोनसाखळी), हातातील कडे, अंगठी इत्यादी) असे साहित्य बरोबर आणू नये. उमेदवारांना पॅड व पेन लेखी परीक्षेच्या ठिकाणी पुरविण्यात येईल, त्यामुळे तसे साहीत्यही बरोबर आणण्याची आवश्यकता नाही.
