महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विद्यापीठ परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे.
पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या बागेत काही चंदनाच्या झाडाचे ओंडके पडले होते. त्यातील ५ ओंडके चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरले आहेत. ही घटना १८ जून ते २६ जून या काळातघडली आहे. त्यांची किमत दहा हजार रुपये आहे.
या प्रकरणीजगन्नाथ शंकर खरमाटे (वय ५८, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पुणे विद्यापीठ परिसरात चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. ती मौल्यवान व औषधी असतात त्यामुळे त्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
