महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसात पायी जाणाऱ्या नागरिकाचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. खडीमशीन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालत जाणाऱ्या दोघांचे लाखभर रुपयांचे किमती मोबाईल हिसकावून पळ काढला आहे.
या चोरी प्रकरणी कोंढवा येथील ४८ वर्षीय इसमाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद व त्यांचा मित्र ०९ जुलै रोजी सायंकाळी ०७:३० वा च्या सुमारास खडी मशिन चौक ते बालाजी हॉटेलच्या दरम्यान रोडवर शितल पेट्रोल पंपासमोर पायी जात असताना दुचाकी वरून दोन चोरटे आले आणि त्यांचे मोबाईल घेऊन पळून गेले.
यातील एक मोबाईल एक लाखाचा आहे. तर दुसरा मोबाईल पाच हजाराचा आहे. काही दिवसापूर्वी अशाच घटना या परीसरात घडल्या आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव करीत आहेत.
