महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केट मध्ये नफ्याचे आमिष दाखवून १३ लाख ५१ हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महिन्यात एका अनोळखीने ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये नफ्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडून एकुण १३,५१,०००/- किंमतीची फसवणूक केली.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खिलारे करीत आहेत.
