महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही. आता गजबजलेल्या रस्त्यावर्रील मोबाईल कंपनीच्या उंच टॉवर वरील दोन किमती अँटिना चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.
बिल्डिंगवरील हे दोन अँटिना एअरटेल कंपनीचे आहेत. त्यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यांची किमत १,२०,००० हजार आहे. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.
