भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलाकडून ४ दुचाकी गाड्या जप्त करुन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीच्या शोधात होते.
त्याचवेळी अमलदार निलेश खैरमोडे व सचिन गाडे यांना चोरीस गेलेली दुचाकी गाडी घेवुन दोन अल्पवयीन मुले राजे चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे फिरत आहेत अशी बातमी मिळाली.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी राजे चौक, आंबेगाव पठार, पुणे या भागात जावुन पाहणी केली. तेथे दोन मुले गुन्हयातील चोरी गेलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी मोटार सायकल, वर फिरत असताना मिळून आल्याने त्याचेकडे त्याबद्दल तपास करता त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी वाहने जप्त केली आहेत. चौकशी करता त्यांनी पुणे शहरात आणखीन दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यानुसार सांगितलेल्या ठिकाणाहुन ३ दुचाकी गाड्या जप्त करुन चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
