भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शाळकरी मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. पोलीसानी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिवराज महेश गायकवाड (वय १९, रा. गुजरवाडी, कात्रज) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार मुलगी आणि आरोपी गायकवाड याची ओळख होती. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. तरीही त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती झाली.
याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
