लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मनी लॉड्रींगमध्ये सहभागी असल्याचे सांगुन सीबीआय कडून बँक खात्याची चौकशी करण्याची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना २८ जून ते १ जुलै या काळात वाघोली परिसरात घडली आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोलीतील एका ६८ वर्षीय नागरिकाने या बाबत फिर्याद दिली आहे.
एका अनोळखी तरुणाने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला व त्यांना तुमच्या बँक खात्याची सीबीआय कडून बँक चौकशी करावयाची आहे.
कारण तुम्ही मनी लॉड्रींगमध्ये सहभागी आहात, असा संशय आहे. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी आपल्या बँक खात्यातून ३० लाखाची रक्कम त्याच्या खात्यात वळती केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.
