महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कधीकाळी बीडच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे लोढा कुटुंबातील तिसरी पिढी शासन व्यवस्थेत नव्हे तर प्रशासन व्यवस्थेत अग्रेसर असल्याचे पुढे येत आहे. उद्योजक दिलीप लोढा यांचा एक मुलगा आय एस, दुसरा आयपीएस झाल्यानंतर आता तिसरा मुलगा श्रीपाल लोढा यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्ट ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेली सीए अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. श्रीपाल यांनी पहिल्या प्रयत्नातच ‘सीए’च्या परिक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
माजी आमदार चांदमल लोढा यांचा श्रीपाल लोढा हा नातू आहे. गेल्या तीन दशकभरापूर्वी लोढा कुटुंब बीड जिल्ह्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवत होतं. पुढे चांदमल लोढा यांच्या मुलाने राजकारणासह समाजकारण करत उद्योग धंद्यात आघाडी घेतली.
मात्र लोढा कुटुंबियाच्या तिसऱ्या पिढीने शासन व्यवस्थेत नव्हे तर प्रशासन व्यवस्थेमध्ये नाव कमावले. श्रीपाल लोढा याने सीए अंतिम वर्ष परिक्षेत उत्तीर्ण होऊन अर्थकारणाच्या क्षेत्रात यश मिळवलं आहे. श्रीपाल लोढा यापूर्वी एलएलबी, सीओईपी (एमईसीएच) या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
