महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रविवार १४ जुलै रोजी श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावर ८५ टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ परमार हॉल, आरसीएम हायस्कूल येथे पार पडला.
सदर समारंभ श्री पूना गुजराती बंधू समाजाचे चेअरमन नितीनभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण आयुक्त तथा यशदा चे संचालक विशाल सोळंकी हे उपस्थित होते.
नितीनभाई देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी मंचावर संस्थेचे मॅनेजींग ट्रस्टी राजेश शहा, नैनेश नंदू, राजेंद्र शहा, हरेश शहा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे विशाल सोलंकी यांनी विद्यार्थ्याना मनाचे ऐकावे, भविष्याची अत्याधिक काळजी करू नये. आपले आवडते करीयर निवडावेत असे मोलाचे मार्गदर्शन केले.
राजेश शहा यांनी पाहुण्यांचे व विद्यार्थाचे स्वागत केले व अभ्यासाबरोबर आपले छंद जोपासावेत असा विद्यार्थांना मंत्र ही दिला.
त्यांनी प्रास्ताविक मध्ये श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक अशा विविध उपक्रमांची माहिती करून दिली. जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी ननेश नंदू यांनी प्रमुख पाहुण्यांचा सर्वांना परिचय करून दिला.
तर केतन कापडिया यांनी उपस्थितांचे आभार प्रकट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतीबेन नागरेंचा यांनी केले. या समारंभामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदव्युत्तर पदवी या परीक्षेत डिस्ट्रिंगशन मध्ये पास झालेल्या ७० विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे हेमंत मणियार, संदीप शहा, विनोद डेडिया, पंकज डेडिया, माधुरीबेन शहा, इत्यादी ट्रस्टी उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाला विध्यार्थी व पालकांची उपस्थितीही वाखण्याजोगी होती.
प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी या सत्कारा प्रीत्यर्थ आपले मनोगत व्यक्त केले.श्री पूना गुजराती बंधू समाज ही पुण्यातील ११० वर्ष जुनी संस्था आहे, ५००० पेक्षा अधिक आजीवन सभासद आहेत. दरवर्षी संस्था असे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवीत असते.
