महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृह, येथे सुमित दरंदले, पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय वारकरी संघ यांच्या वतीने कारागृहातील कैद्यासाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून माणुस या जीवनाचा अर्थ व जीवन कसे जगावे या विषयावर आधारीत व्याख्यान रविवारी (दि.१४ जुलै) आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी शिवचरित्रकार, समाजभूषण पुरस्कर्ते व जीवन गौरव पुरस्कारकर्ते ह. भ. प यशवंत महाराज फाले यांनी किर्तनपर प्रवचनाव्दारे मार्गदर्शन केले. कारागृहातील चार भिंतीच्या आत कैद्यांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल.
हा उपक्रम अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, व डॉ. जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) यांच्या संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, आर ई गायकवाड, उपअधीक्षक, एस. एम. पाडुळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, आर. के. कानडे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य, सुमित दरंदले व इतर सहकारी यांनी कामकाज पाहीले.
