महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये सुरु असलेली गावठी हातभट्टी लोणीकंद पोलिसांनी उध्वस्त केली आहे.
दारुचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त परि. ४, विजयकुमार मगर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार दि. १२ जुलै रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश निकाळजे यांचे नेतृत्वाखाली भावडी गावच्या हद्दीत हांडगर वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जिवन राजाराम साठे (वय २५ वर्षे, रा. लोहगाव ) याने लावलेल्या हातभट्टीवर छापा टाकला.
त्यामध्ये त्याने २१० लिटर दारु जप्त करुन, ३०,००० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य, एकुण १,७६,०००/- रु. चा मुद्देमाल जागीच ताब्यात घेवुन नष्ट केला.
लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास स.पो.नि. रविंद्र गोडसे हे करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील पोलीस उप आयुक्त परि-४ पुणे विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, विठ्ठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगावकर, तपास पथकाचे स.पो.नि. रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार तिकोणे, जगताप, माने, चिनके यांनी केली.

















