महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेरोड येथील १७ लाख रुपयाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास अटक करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. त्याच्या कडून सुमारे १७ लाख रुपयांचे दागिने, जड जवाहीर,हिरे आदि माल हस्तगत करण्यात आला आहे.
शहराचे मध्यवर्ती भागामध्ये घरफोडी चोरी सारखा गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटना स्थळापासुन विवीध भागातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी केली.
प्राप्त झालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजची पहाणी करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनावणे यांना घरफोडी करणारा हा यापूर्वीच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी अल्लाबक्ष पिरजादे (रा. २१७ मंगळवार पेठ पुणे) हा असल्याचे लक्षात आले.
वरिष्ठांच्या आदेशाने युनिट-१ चे सर्व पथकाने वरील आरोपीचा शोध घेण्यास सुरू करुन त्याच्या रहात्या घराजवळ कोंबडीपुल शिवाजी आखाडाजवळ मंगळवार पेठ पुणे येथे सापळा रचुन दबा धरुन थांबले.
आरोपी हा कोंबडीपुल शिवाजी आखाडाजवळ मंगळवार पेठ येत असल्याचे दिसताच तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विचारणा केली असता तो प्रथम उडवा उडवीची व असमाधानकारक माहीती देवु लागला.
त्यामुळे त्याला अधिक विश्वासात घेवुन व त्यास प्राप्त सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता त्याने सांगितले की, दि. ०७ जुलै रोजी बंगल्याच्या खिडकीचे गज लोखंडी पाईपच्या सहाय्याने वाकवुन बंगल्यात प्रवेश करुन कात्रीच्या सहाय्याने कपाटाचे लॉक काढुन कपाटातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरले.
सदरचे दागीने पुणे मनपा पी.एम.टी डेपो शिवाजीनगर पुणे येथील मेट्रो स्टेशन जिन्याचे लगत नदी पात्रात कंपाउंड लगत एका दगडाखाली दडवले असल्याचे सांगितले. आरोपीसह सदर ठिकाणी जावून घटनास्थळावरून पिशवीमध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे १७,६४,०६०/- रु चे दाखल गुन्ह्यातील २० तोळे वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागीने व ८०००/- रु. रोख रक्कम असा एकुण १७,७२,०६०/-रु. चा माल ताब्यात घेण्यात आला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ०१. शब्बीर सय्यद सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, महेश बामगुडे, आण्णा माने, राहुल मखरे, अय्याज दड्डीकर, प्रफुल शेलार, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.
