महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खोटी कागदपत्र बनवून तुम्ही मनीलाँड्रींग केली आहे, तुमची चौकशी करावी लागेल, असे सांगुन कल्याणीनगर मधील एका तरुणाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारकाने संपर्क साधला व मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर बोलत आहे, असे खोटे सांगुन खोटी कागदपत्रे पाठवून फिर्यादीच्या नावाने मनी लैंड्रींग केली असल्याचे सांगितले.
तसेच अटक करण्याची भीती दाखवून तसेच सर्व केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगुन मनी लाँड्रींग बाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या बँक खात्यावरील १४,००,०००/- रू. ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेतले. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) छगन कापसे करीत आहेत.