मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या तरुणांनी त्यांना पत्ता विचारला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.
त्यांनी आरडओरडा केला पण ते पळून गेले. मंगळसूत्राची किमत ३५ हजार रुपये आहे. त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा तपास सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे करीत आहेत.

















