कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नवी पेठ येथील बेहरे क्लास जवळ असलेल्या सदनीकेतून चोरट्यांनी दहा लाखाचे दागिने व रोकड लंपास केली आहे.
या प्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ५ जुलै ते २० जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. २८१ एजे कॉम्प्लेक्स, बेहरे क्लासेस समोर, फ्लॅट नं ०२, नवी पेठ, पुणे यातील फिर्यादी यांच्या फ्लॅटचे वॉशरुमचे खिडकीतील गज चोरट्यांनी कापुन काचा तोडुन घरात प्रवेश करुन कपाटाचे लॉकर मधील १०,१०,०००/- रु. कि. चे सोन्याचे दागिने व २५,०००/- रोख असा ऐवज चोरी करून नेला.
