समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आयपीओ मिळवुन देतो असे प्रलोभन दाखवुन व फियादीचा विश्वास संपादन करुन एका अनोळखी ने भवानी पेठेतील तरुणाची २१ लाखाची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीओ मिळवुन देतो असे प्रलोभन दाखवुन व फियादीचा विश्वास संपादन करुन एका व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करून लिंक पाठवुन त्याद्वारे वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये २१,७०,०००/- रु. भरण्यास सांगुन आर्थिक फसवणुक केली. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश भडाख करीत आहेत.
















