चतुंश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डीमॅट खात्याचा मेल आयडीचा ताबा घेऊन कंपनीचे शेअर्स हे डीमॅट खात्यावर ट्रान्सफर करुन ८ लाख रुपयाच्या फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांच्या डीमॅट खात्याचा कोणीतरी अनोळखीने मेल आयडीचा ताबा घेवुन डीमॅट खात्यावर शेअर ट्रान्सफर करून घेवुन फिर्यादीची ८,००,०००/- रु.ची फसवणूक करण्यात आली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयमाला पवार करीत आहेत.

















