वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी तरुणाने ऑनलाईन माध्यमाव्दारे आपण पोलीस बोलत असल्याचे सांगून जेष्ठ नागरिकाची २० लाखाची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने पोलीस असल्याचे बतावणी करुन गैरकृत्य बाबत धाक दाखवुन खात्यावर २०,८०००० रुपये भरण्यास सांगितले. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पंतगे करीत आहेत.
