भारती विद्यापीठ पोलिसांना पाच लाखाचे बक्षिस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राहत्या घरातुन रागाच्या भरात ४ महिण्यापुर्वी गेलेल्या अल्पवयीन बालकास मध्यप्रदेश येथील जबलपुर येथुन ताब्यात घेण्यात स्वारगेट व भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडुन ५ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक अल्पवयीन बालक हा गेली चार महिने झाले राहत्या घरातून रागाच्या भरात निघून गेला होता. सदर बालकाचा शोध पुणे पोलीसांकडुन चालू होता. गेली चार महिन्यापासून बालक मिळून येत नसल्याने त्यास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
बालकाचे फोटो इतर राज्यात पाठवून सदर बालकाबाबत माहिती असल्यास प्रत्यक्ष फोन द्वारे कळवावे याबाबत अनेक राज्यात फोटो पाठवण्यात आले होते. त्यावरून सदर बालक हा जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्थानकावर दिसून आल्याचे खात्रीदायक माहिती स्वारगेट तपास पथकातचे सह प्रभारी पो. उपनिरीक्षक अशोक येवले यांना लागली.
त्यांनी तात्काळ सदरची माहीती पोलीस उपायुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील व पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ दशरथ पाटील यांना कळवुन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर बालकास ताब्यात घेण्यात आले.
तसेच तात्काळ पोलीस उपायुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील यांच्या सूचना सदर बालकास ताब्यात घेण्याकरता स्वारगेट तपास पथक टीम रवाना करुन सदर बालक यास जबलपूर मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेऊन पुणे शहर येथे घेऊन येवुन त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.
सदर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. सदरची कामगीरी ही प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मर्तना पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नंदिनी वग्यानी सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ दशरथ पाटील यांच्या सुचना व आदेशान्वये तपास पथकातील उपनिरीक्षक अशोक येवले व पो.अं. फिरोज शेख, पो. अं. हर्षल शिंदे यांनी केली आहे.
