ठरावीक बिल्डरचा डाव आमदाराने हाणून पाडला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल
पुणे : मागील अनेक वर्षापासून रखडलेला बिबवेवाडी हिलटॉप R झोन करण्याचा विषय आता सरकार दरबारी देखील चव्हाट्यावर आला आहे.
पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या अर्थपूर्ण निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच या सर्व भागातील आरक्षण काढा अशी मागणी देखील केली.
हा निर्णय कोणत्या राजकीय नेत्यांमुळे घेतला गेला, कोणते बांधकाम व्यवसायिक स्वताच्या फायद्यासाठी असे निर्णय करून घेत आहे याची माहिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क लवकरच सर्वासमोर प्रकाशित करेल. यासाठीची माहिती मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान आमदार माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे या भागातील हजारो जागा मालकांनी मिसाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
नगरविकास विभागाने बिबवेवाडी येथील टीपीएस 1818/2017 प्र.क्र.116/2021 नवि 13 दि. 12 जून 2024 सह पत्रानुसार 1) सर्वे नंबर 623/7 (CTS no.507/20), 2) सर्वे नंबर 652 (CTS No.533/1) 3) सर्वे नंबर 652/3 (CTS No.533/7) हे तीन भूखंड एकूण क्षेत्र 7 एकर फक्त निवासी करण्याचा अर्थपूर्ण निर्णय घेतला होता.

















