लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी ६३ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०३ जुलै रोजी पहाटे मातोश्री निवास, सिध्दिविनायक पार्क (स्टार सिटी) काळभोर नगर, कवडी माळवाडी येथील फिर्यादी हे बाहेरगांवी गेले होते.
त्यावेळी घराचया दरवाजाची कडी व कुलुप अज्ञात इसामाने तोडुन आत प्रवेश केला घराचे बेडरुम मधील वार्डरोब मध्ये ठेवलेले २५,०८,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हे घरफोडी करून नेले. हा तपास पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.















