चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाइलद्वारे संपर्क करून गुंतवणुकीस भरीस पाडून महिलेची १२ लाखाची फसवणूक केल्याची घटना पाषाण सुस रोडवरील भागात घडली आहे.
अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना एका कार्ड मधे पैसे भरण्यास सांगुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवुन देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना त्यांचे बँक खात्यात १२,५२,०००/- रु. भरण्यास भाग पाडुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. हा तपास पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे करीत आहेत.
