स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी येथील वेस्ट व्हयु हौसिंग सोसायटी, बी बिल्डींग प्लॅट नं.११, हि सदनिका फोडून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १ ते ५ जुलै दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी फ्लॅट ला कुलुप असताना घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाच्या तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश केला. व घरातील १,८८,०००/- रू. चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे. हा तपास पोलीस उप निरीक्षक राहुल जोग करीत आहेत.
















