महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट १००८ प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जन्मजयंती महोत्सव निमित्त जैन समाजातील १० वी विशेष गुणवत्ता प्राप्त विध्यार्थी व विद्यार्थिनीचा “वीतराग सेवा संघ” तर्फे महावीर प्रतिष्ठान येथे सत्कार करण्यात आला.
प. पू. गुरुदेव श्री गौतममुनिजी म. सा. “बारसादाता” आदी ठाणा यांच्या पावन सानिध्यात हा सन्मान समारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरु भगवंतानी मार्गदर्शन करत उपस्थित सन्मानित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सर्वाना भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी झावरे (एफसीए, एमडी झावरे प्रोफेशनल अकॅडमी), राजकुमार चोरडिया (प्रवीण मसाले) तर विशेष अतिथी. संजय मुथा (उद्योजक), विजयकांत कोठारी (अध्यक्ष, साधना सदन श्री संघ), समारोहाचे अध्यक्ष ललित शिंगवी (उद्योजक) आदि मान्यवराच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
वीतराग सेवा संघ चे सचिव संजय ओस्तवाल यांनी प्रास्तविक करताना संस्थेने गेल्या अनेक वर्षात केलेल्या उपक्रमची माहिती दिली. रक्तदान शिबीर, गुणवंत विध्यार्थी सन्मान, आरोग्य शिबीर, गरिबांना अन्न दान, शितजल केंद्र, गौ सेवा असे अनेक उपक्रम या संस्थेने समाज उपयोगी कार्यक्रम केल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी झावरे मार्गदर्शन करताना म्हणाले, यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी सर्व विद्यार्थ्यानी आपले ध्येया (लक्ष) चा विचार केला पाहिजे. जसे मी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला तसे प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. या देशाचे, या समाजाचे, आपल्या परिवाराचे नाव कसे उंचावेल त्याकडे आपली वाटचाल झाली पाहिजे.
आमच्या काळात खूप अडचणी येत असत., पण आजच्या पिढीला शिक्षणासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. नाव कमवायला खूप वर्ष लागतात, गमवायला क्षण ही लागत नाही. अनंत कष्ट करायची जिद्द पाहिजे, कुठल्या क्षेत्रात जायचे याचा सुरवातीलाच विचार केला पाहिजे. शिकण्याची वृत्ती ठेवत, ज्ञानाचा सद्उपयोग करत आपल्याला अभ्यासात झोकून दिले पाहिजे.
पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवत त्यांना वेळोवेळी आपल्या व्यस्त जिवनातून त्यांना वेळ दिला पाहिजे. राजकुमार चोरडिया उपस्थित जमलेल्या सर्व विद्यार्थ्याना भावी वाटचालसाठी शुभेच्छा देत म्हणाले मी सुद्धा फार बिकट परिस्थितीतुन संघर्ष करत आज या मुकाम वर पोचलो आहे.
जीवनात यशस्वी होणे इतके सोपे नाही, तर आपल्या आयुष्यातील शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकांचे विचार ऐकण्याची सवय ठेवा. त्यांनी दाखवलेल्या मार्गातून आपले मार्ग तयार करा. अनुभवी लोक आपल्याला त्यांच्या कठीण काळातुन यशस्वी कसे झाले याचा आपण बोध घेतले पाहजे.
ललित शिंगवी यांनी जैन समाजातील १० वी विशेष गुणवत्ता प्राप्त विध्यार्थी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले मी सुद्धा एक वेळेस आपल्या सारखा तुमच्या जागी बसलेलो होतो. मनात एकाच विचारा सारखा येत होता. की मी कसा प्रमुख पाहुण्याच्या समोर बसेन, आणि ते आज यशस्वी साकार झाले, पण यासाठी दिवस रात्र एक करून संघर्ष करत आपले शिक्षण पूर्ण केले.
यशस्वी उद्योजक होण्याचा निश्चय केला. अनेकांना रोजगार देऊ त्यांच्या सु:ख दुखात सहभागी होत मी जीवनाची वाटचाल करत राहिलो. या प्रसंगी वितराग सेवा संघ चे अध्यक्ष वैभव सेठिया, शशिकांत कोठारी, दिलीप कांकरिया, देवेंद्र मुथा व या संस्थेतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गेलडा यांनी केले, प्रास्तविक संजय ओस्तवाल यांनी केले व आभार प्रवीण गुंदेचा यांनी मानले.