मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखाच्या पथकाने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेतील सर्व पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत व मोहीम राबविणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने मोहीमबाबत कारवाई करण्यात आली आहे.
दि.०८ऑगस्ट खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडील पोलीस अंमलदार घावटे, चेतन आपटे यांना मिळालेल्या बातमीवरुन प्रतिक योगेश चोरडे, (वय २१ वर्षे, रा. ओमसाई अर्पा. गुरूकुपा सोसायटीच्या मागील बाजुस केशवनगर मुंढवा, पुणे) यांचेकडून १ देशी बनावटीचे पिस्तुल १ काडतुसे, अंदाजे किमंत २५,०००/- रु.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक. प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, सैदोबा भोजराय, चेतन आपटे, अनिल कुसाळकर, संग्राम शिनगारे, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश खरात, चेतन शिरोळकर, अमोल राऊत, राहुल उत्तरकर, दिलीप गोरे, किशोर बर्गे, यांनी केली आहे.