महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पॅरिस : अखेर ऑलिम्पिकचे सूप वाजले. ऑलिम्पिकच्या संयोजनाच्या परीक्षेत पॅरिस पास झाले. आता लॉसएंजेलिस कडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. अखेरच्या शंभर दिवसांचे काउंटडाउन सुरू होते, त्यावेळी यशस्वी संयोजनाबाबत शंका घेतली जात होती.
‘सिटी ऑफ लाइट’ मधील ऑलिम्पिक काही आठवड्यांवर असताना फ्रान्समध्ये राजकीय पेच निर्माण झाला होता. सुरक्षा यंत्रणेला हल्ल्याची धास्ती होती. फ्रान्सवासीय संयोजनावर टीका करीत होते. त्यातच टोकियोतील उन्हाळी आणि बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक प्रेक्षकांविना झाल्यामुळे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर दडपण आणत होते.
मात्र, पॅरिस सर्व परीक्षेत पास झाले. ‘पॅरिसने सर्वांनाच धक्का दिला,’ अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मार्केटिंग विभागाचे माजी प्रमुख मायकेल पेन यांनी केली. जाहिरातीतूनही प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या एनबीसी युनिव्हर्सलला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या ओटीटीवर चाहत्यांनी पहिल्या दोन दिवसांतच टोकियोला मागे टाकले. पॅरिसमधील लढत खेळाबाहेर गोंधळामुळेच गाजली होती. मात्र, हा सर्व इतिहास झाला आहे. ऑलिम्पिक संयोजन पांढरा हत्ती होणार नाही, याची काळजी फ्रान्सने घेतली, त्यांनी जगात लोकप्रिय असलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्टेडियमची उभारणी केली.
त्यांनी जणू संपूर्ण पॅरिसचे खुले स्टेडियम केले. पॅरिसमधील दिवस सुरूहोत असतानाच सेन नदीवरील जलतरणस्पर्धा, सराव पाहण्यासाठी गर्दी होत असे. त्यासाठी दीड अब्ज युरो खर्ची घातले होते. दिवस मावळत असताना चाहत्यांनी टुलेरिज गार्डन, आयफेल टॉवर परिसर फुलून येत असे.
उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी सकाळी रेल्वे आणि टेलिकॉम यंत्रणेवरील सायबर हल्याचे कोडे कायम आहे. ऑलिम्पिक क्रीडा ग्राम उभारताना सेन सेंट डेनिस परिसरातील लोकांचे पुनर्वसन अद्यापही पूर्णपणे झालेले नाही. क्रीडानगरीतील खाद्यपदार्थांवर अनेक जण नाराज होते. पॅरिसने ऑलिम्पिक्चे कोणतेही वाद न होता संयोजन करता येते हे दाखवले.
त्यामुळे संयोजनासाठी पुन्हा स्पर्धा वाढेल. तुर्कीने २०३६साठी आपली उमेदवारी जाहीर केली. भारत उत्सुक आहेच.पॅरिसची कॉपी नव्हे, तर मार्ग पॅरिसने अप्रतिम संयोजन केले. त्यांनी जागतिक दर्जाचा अनुभव दिला, असे २०२८ च्या संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैसी वॅसेरमन यांनी सांगितले.
लॉस एंजेलिसने आयफेल टॉवरची कॉपी करण्याचा कामगिरी प्रयत्न केला, तर त्यांचे हसे होईल. पॅरिसने आपल्या संस्कृतीचा संयोजनात कसा वापर करता येतो हे दाखवले आहे. लॉस एंजेलिस हॉलिवूडसाठी ओळखले जाते, त्याचा कसा उपयोग करता येईल, हा विचार सुरू झाला आहे. त्याने फ्रांसची कॉपी करू नये इतकीच अपेक्षा आहे.