उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवे धावडे परिसरात घडला आहे.
या प्रकरणी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३ मे ते ४ जुलै दरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना आनोळखी इसमांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे शेअर्स व आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल असे अमिष दाखवले.
त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांची १४,७०,२००/- रूपयांची आर्थिक फसवणुक केली. नफा न मिळाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक. मोहन खंदारे करीत आहेत.