शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाची धडाकेबाज कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले ११.५० लाख रुपये किंमतीचे एकुण ५३ मौल्यवान मोबाईल फोन पुणे शहर, विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकास यश आले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलिस हवलदार रुपेश वाघमारे, पोलिस शिपाई आदेश चलबादी व रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून, त्याबाबत तांत्रिक तपास केला असता हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले.
सदरचे मोबाईल फोन वापरकत्यांशी तसेच संबधीत पोलीस स्टेशन कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण ११.५० लाख रु. किमतीचे ५३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण पाटील, परीमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या हस्ते परत करण्यात आले.
सदर मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. पुणे पोलिसांनी पुणे शहरातील नागरिकांना आवाहन केले आले आहे कि, आपण प्रवास करताना बस मध्ये चढताना-उतरताना आपले मोबाईल व इतर मोल्यवान वस्तु संभाळावे.
तसेच संशयीत व्यक्ती अढळल्यास तात्काळ ११२ या नंबरवर संपर्क करावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला येवुन तक्रार punepolice.gov.in/LostFound Reg या वेबसाईटला प्रथम नोंद करावी. नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जावून त्याची एक कॉपी द्यावी.
त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाच्या https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी, नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन संचमिट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सहायक पोलीस आयुक्त, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, मा. साईनाथ ठोंबरे, सहयक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेगय, पोलीस हवलदार रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई आदेश चलबादी, रोहित झांबरे, महिला पोलीस शिपाई रुचिका जमदाडे यांनी केली आहे.