महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील जयराज भवन या संस्थेच्या वास्तुमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष भरतभाई केशवलाल शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी लुई – ब्रेल अंध, अपंग कल्याण संस्थेच्या कलाकारांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम सादर केला. या संस्थेस स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्रस्टच्या वतीने रु.३१००० ची देणगी महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उप आयुक्त संजय रा. कदम यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप डाह्याभाई मेहता यांनी तसेच आयोजन सेक्रेटरी सुनील रमणलाल शहा यांनी केले. आभार संस्थेचे कार्यकारी सदस्य. अनील राजाराम शहा यांनी मानले. कार्यक्रमास जैन समाजातील अनेक मान्यवर, धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच संस्थेचे सदस्य सहपरिवार उपस्थित होते.