महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या शोध मोहिमेमुळे बिबवेवाडी येथील हरवलेली१० वर्षाची मतीमंद मुलगी रात्री दीड वाजता सापडली. मुलगी हरविल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर तिचा शोध सुरु झाला.स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्रीपासून सुरु असलेला अलर्ट ही मुलगी सापडल्यानंतर संपला अन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नि:श्वास सोडला.
कात्रज येथील एका चौकातील सीसीटीव्हीमध्ये ही मुलगी कैद झाली. त्याचवेळी तिच्या आजूबाजूला असलेल्या संशयितामुळे तिचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र त्यामुळे संपूर्ण पुणे शहर पोलीस दल अर्लट झाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी रात्री उशिरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला भेटदेऊन मुलीच्या शोधाबाबत तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. संपूर्ण क्राईम ब्रँचही शोध घेऊ लागली.
३०० पोलीस रात्रभर शोध घेत असताना पहाटे दीड वाजताही मुलगी सुखरुप कोंढवा पोलिसांच्या हद्दीत सापडली. तेव्हा पोलिसांचा जीव भांड्यात पडला. बिबवेवाडी येथील एका कामगाराची १० वर्षाची मतीमंद मुलगी काही न समजता ही निघून गेली होती. बिबवेवाडी पोलिसांनी या मुलीच्या हरविल्याची माहिती सर्वत्र पाठविली होती.