अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भाजी खरेदी करत असताना चोरट्यांनी पळत ठेवून महिलेच्या पर्समधील साडेचार लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे.
या प्रकरणी चतुःश्रृंगी येथील ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान ही महिला पतीसह दुचाकीवर आली होती. गोवरी आळीत भाजी घेत असताना पर्समध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने ४,५९,०००/- रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे करीत आहेत.

















