लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून कपडे फाडत अत्याचार करण्याचा प्रयत्न लोणीकंद येथे झाला.
याप्रकरणी अशोक कुटे (वय ३०, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरी एकटी असताना, आरोपीने घरात येऊन तिचे कपडे फाडत अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करून विरोध केला असता, त्याने “आईला सांगितल्यास तुला जीवे मारीन,” अशी धमकी दिली. हा तपास लोणीकंदचे पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड करीत आहेत.

















