अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकीवरील चोरट्यांनी पायी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला २६ ऑगस्ट रोजी पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून पळवून नेले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

















